TSK

TSK · लूक 22:43

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

पाहा, तू पुष्कळांना शिकवले आहेस. तू अशक्त हातांना शक्ती दिली आहेस.

¶ तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने माझ्या ओठास स्पर्श केला व मी माझे तोंड उघडले आणि जो माझ्यापुढे उभा होता त्याच्याशी मी बोललो, “हे प्रभू या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले आहे आणि माझ्यात बळ राहीले नाही.

¶ आणि त्यास म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी घे, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की; ‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय दगडावर आपटू नयेत म्हणून ते तुला आपल्या तळहातावर झेलून घेतील.’”

‹मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या सहा हजार सैन्याची एक अशा बारा पेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हास कळत नाही काय?›

‹परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.”›

¶ सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे तो देहात प्रकट झाला, आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला, तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, राष्ट्रांमध्ये गाजवला गेला, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.

¶ सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठवले जातात की नाही?