TSK

TSK · मला 1:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग तू फारोला सांग की, परमेश्वर म्हणतो इस्राएल माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे.

तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचा मान राखलाच पाहिजे आणि माझा शब्बाथ पाळलाच पाहिजे; मी तुमचा देव परमेश्वर आहे!

मूर्ख आणि निर्बुद्ध जन हो, परमेश्वराशी असे वागता? तो तर तुमचा पिता, निर्माता कर्ता आणि धर्ता तोच आहे.

आपल्या पित्याला शाप देणारा, आणि आपल्या आईला आशीर्वाद देत नाही अशी एक पिढी आहे,

हे आकाशा, ऐक आणि हे पृथ्वी लक्षपूर्वक कान दे; कारण परमेश्वर हे बोलला आहेः “मी लेकरांचे पालनपोषण करून त्यांना वाढविले, परंतु त्यांनी मजविरूद्ध बंडखोरी केली.

तुझ्या नावाला हाक मारेल असा कोणी नाही आहे, आणि तुला धरून घ्यायला कोणी प्रयत्न करीत नाही. कराण तू आपले मुख आम्हापासून लपवले आहे आणि आम्हांस आमच्या पातकांच्या हाती सोपवून दिले आहे.

पण मी, माझ्याकरिता खास द्राक्षवेली म्हणून खरे बीज असे तुला लावले, तर आता तू बदलून माझ्यासाठी विश्वासघातकी अशा परक्या जातीच्या द्राक्षवेलीप्रमाणे झाली आहे.

कारण संदेष्टेच काय, पण याजकसुद्धा विटाळले आहेत. माझ्या मंदिरात त्यांची दुष्कृत्ये आढळली आहेत, परमेश्वर असे म्हणतो.

कारण रेखाबाचा मुलगा योनादाबाच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांनी त्यांना दिलेल्या आज्ञा पाळल्या, पण या लोकांनी माझे ऐकण्याचे नाकारले.

माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहेत. कारण तुम्ही ज्ञानास नाकारले म्हणून मी सुध्दा तुम्हास माझे याजक म्हणून नाकारीन. माझे, तुमच्या देवाचे नियमशास्त्र तुम्ही विसरलात म्हणून मी ही तुमच्या मुलांना विसरेन.

एफ्राईम म्हणाला, “मी खरोखर धनवान झालो आहे, माझ्यासाठी संपत्ती मिळवली आहे. माझ्या सर्व कामात त्यांना अन्याय दिसला नाही, ज्यामध्ये माझ्यात पाप आढळते.”

तुम्ही म्हणता, “असे का नाही?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारूण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षीदार आहे. ती तर तुझी सहचारिणी असून व तुझ्या कराराची पत्नी असून तिच्याशी तू विश्वासघाताने वागला आहेस.

तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून तुम्ही माझे नियम अनुसरण्याचे सोडून भलतीकडे वळले आहात, ते तुम्ही पाळले नाहीत. माझ्याकडे फिरा म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “पण तुम्ही म्हणता, ‘आम्ही कसे परत फिरावे?’

¶ ‹म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः› ‹हे आमच्या स्वर्गातील पित्या, › ‹तुझे नाव पवित्र मानले जावो.›

¶ ‹मला प्रभू, प्रभू म्हणणारा प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल.›

‹ते देवाचे नियमशास्त्र मोडीत आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे.›

‹मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपल्या आई-वडीलांचा सन्मान कर आणि जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्यास ठार मारलेच पाहिजे.’›

‹जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.”›

पण आपण योग्य प्रश्न विचारला आहे हे इतरांना दाखवून देण्यासाठी त्याने येशूला विचारले, “मग माझा शेजारी कोण?”

‹तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे.›

¶ जे सर्व दास म्हणून जुवाखाली आहेत तितक्यानी आपापल्या मालकास सर्व सन्मानास योग्य मानावे यासाठी की देवाचे नाव आणि शिकवण यांची निंदा होऊ नये.

आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे.