TSK

TSK · मार्क 13:14

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएल लोकांच्यात राहणाऱ्या मनाने व शरीराने बेसुंती असलेल्या परक्याने कोणी माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करू नये.

¶ एक सप्तकाचा करार तो पुष्कळासोबत पक्का करेल, सप्तकाच्या मध्यात तो यज्ञ आणि अर्पणे बंद करील. नाश करणारा अमंगळाच्या पंखावर स्वार होऊन येईल. संपूर्ण नाश आणि अंत ठरलेला आहे. नाश करणाऱ्यावर त्याचा वर्षाव करण्यात येईल.”

रोजचे बलीहवन या वेळेपासून बंद करण्यात येईल आणि नाशदायी अमंगळाची स्थापना होईल तेव्हापासून 1, 290 दिवस लोटतील.

¶ ‹तर दानीएल संदेष्ट्याने सांगितले होते, ओसाड करणारी अमंगळ गोष्ट, पवित्र जागी परमेश्वराच्या भवनामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.”› (वाचकाने हे ध्यानात घ्यावे.)

मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा त्याने त्यास यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले, फिलिप्प त्यास म्हणाला, “तुम्ही जे वाचत आहात ते तुम्हास समजते काय?”

¶ बंधूनो, तुम्ही विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा.

¶ येथे ज्ञानीपणच आहे; ज्याला बुद्धी असेल त्याने पशूच्या संख्येचा हिशोब करावा कारण, ती एका मनुष्याची संख्या आहे आणि त्याची संख्या सहाशे सहासष्ठ आहे.