TSK

TSK · मार्क 16:18

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

त्यातील एकजण रानात शाकभाजी गोळा करून आणावयास गेला. तेव्हा त्यास एक रानवेल दिसला व त्याची फळे तोडून आपल्या ओटीत भरून, त्याने ती फळे कापून भांड्यात टाकली. परंतु ती कडू होती हे त्यांना माहित नव्हते.

त्याने आग्रहाने त्यास विनवणी केली की, “माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.”

आणि पेत्र म्हणाला, “रूपे व सोने माझ्याजवळ काहीच नाही; पण जे माझ्याजवळ आहे. ते मी तुला देतो, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग.”

आणि त्याच्या नावाने त्याच्या नावावरील विश्वासाकडून ज्याला तुम्ही पाहता, व ओळखता त्या या मनुष्यास शक्तीमान केले आहे. आणि, त्याच्याद्वारे प्राप्त झालेल्या विश्वासानेच तुम्ही सर्वांच्यादेखत याला हे पूर्ण आरोग्य दिले आहे.

कारण ज्या मनुष्यावर हा बरा करण्याचा चमत्कार घडला होता तो चाळीस वर्षाहून अधिक वयाचा होता.

इतके चमत्कार घडले की लोकांनी दुखणेकऱ्यास उचलुन रस्त्यामध्ये आणले, आणि पेत्र जवळून येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी म्हणून त्यांना बाजांवर व पलंगावर ठेवले.

पेत्र त्यास म्हणाला, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे; ऊठ, आपले अंथरुण नीट कर.” ऐनेयास ताबडतोब उभा राहिला.

पौलाच्या शरीरावरून रुमाल आणि कपडेही आणून काही, लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवत असत, जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात.

पुब्ल्याचे वडील तापाने व पोट खराब असल्यामुळे आजारी होते, त्यामुळे अंथरुणाला खिळून होते, पौल त्या आजारी व्यक्तीला भेटायला गेला प्रार्थना करून पौलाने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि त्या मनुष्यास बरे केले.

दुसर्‍याला त्याच आत्म्याच्या योगे विश्वास, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या योगे निरोगी करण्याची कृपादाने,