TSK

TSK · मार्क 2:26

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

अहरोन व त्याच्या मुलांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दारापाशी खावी;

¶ दावीद नोब शहरात अहीमलेख याजकाजवळ आला आणि अहीमलेख कापत कापत दावीदाला भेटायला आला व त्यास म्हणाला, “तू एकटा का आलास आणि तुझ्याबरोबर कोणी का नाही?”

त्यानंतर असे झाले की, अहीमलेखाचा मुलगा अब्याथार दावीदाकडे कईला येथे पळून गेला तेव्हा त्याने आपल्या हाती एफोद आणले.

अहीटूबाचा मुलगा सादोक आणि अब्याथारचा मुलगा अहीमलेख हे याजक होते. सराया कार्यवाह होता.

तेव्हा देवाचा कोश घेऊन सादोक आणि अब्याथार यरूशलेमेला परतले आणि तिथेच राहिले.

शबा चिटणीस होता. सादोक आणि अब्याथार हे याजक होते.

राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी केवळ शुनेमकरीण अबीशगेची मागणी कशाला करतेस? त्याच्यासाठी राज्यदेखील का मागत नाहीस, तो माझा मोठा भाऊ आहे म्हणून आणि याजक अब्याथार आणि यवाब, सरुवेचा यांच्यासाठी देखील राज्य माग.”

बनाया हा यहोयादाचा पुत्र सेनापती होता सादोक आणि अब्याथार याजक होते