TSK

TSK · मार्क 6:11

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

परमेश्वर देव जाहीर करतो की सदोम तुझी बहीण आणि तुझी मुलगी, तू आपल्या बहिणीप्रमाणे वाईट कृत्ये केली नाहीस.

¶ तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चात्ताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला.

‹जितके तुम्हास अंगीकारीत नाहीत तितक्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या नगरातून निघते वेळी आपल्या पायांची धूळ झाडून टाका.”›

‹मी जर आलो नसतो आणि त्यांच्याशी बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते, पण आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही.›

परंतु यहूदी लोकांनी पौलाला विरोध केला, त्यास यहूदी लोक वाईट रीतीने बोलले, तेव्हा आपला निषेध दर्शविण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले, तो यहूदी लोकांस म्हणाला, “जर तुमचे तारण झाले नाही, तर तो तुमचा दोष असेल! तुमचे रक्त तुमच्याच माथी असो! मी निर्दोष आहे, येथून पुढे मी परराष्ट्रीय लोकांकडेच जाईन.”

देव, माझ्या सुवार्तेप्रमाणे जेव्हा मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा ख्रिस्त येशूकडून न्याय करील त्यादिवशी हे दिसून येईल.

¶ सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही.

तर जे धार्मिकांना त्यांच्या परीक्षेतून कसे सोडवावे व जे अनीतिमान लोकांस शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून, ठेवावे हे प्रभूला कळते.

¶ ह्यात आपल्यामध्ये प्रीती पूर्ण केलेली आहे यासाठी की, न्याय ठरण्याच्या दिवशी आम्हास धैर्य असावे, कारण जसा तो आहे तसेच आपणही या जगात आहोत.