TSK

TSK · मार्क 6:56

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

इस्राएली वंशजाशी बोल आणि त्यांना आज्ञा कर की, त्यांनी पिढयानपिढया आपल्या वस्त्राच्या टोकांना गोंडे लावावे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर एक निळा दोरा बांधा.

काही इस्राएली लोक एका मृताला पुरत असताना त्यांनी या सैनिकांना पाहिले. तेव्हा त्या लोकांनी अलीशाच्या कबरेतच तो मृतदेह टाकला आणि पळ काढला. अलीशाच्या अस्थींना त्या देहाचा स्पर्श होताच तो मृत पुन्हा जिवंत झाला आणि आपल्या पायावर उभा राहिला.

कारण त्याने अनेक लोकांस बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्यास स्पर्श करण्यासाठी त्याच्या अंगावर पडत होते.

सगळा लोकसमुदाय त्यास स्पर्श करू पाहत होता, कारण त्याच्यामधून सामर्थ्य येत होते आणि सर्वांना ते बरे करत होते.

येशूने उत्तर दिले, ‹“हे पुरेसे असू द्या.”› आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्यास बरे केले.

आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल; असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.”