TSK

TSK · मत्त. 4:14

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

जी फार त्रासात होती ती त्यावरील विपत्ती घालवून देण्यात येईल. मागील काळी त्याने जबुलून व नफताली प्रांताची, अप्रतिष्ठा केली, पण पुढील काळी समुद्राकडील भाग, यार्देनेच्या पलीकडचा भाग राष्ट्रांचा गालील यांची तो प्रतिष्ठा करील.

तो हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. “मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे.” असे जे प्रभूने संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले ते पूर्ण झाले.

¶ “त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.

‹परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिजे असा जो शास्त्रलेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?”›

‹मी तुम्हास सांगतो, तो अपराध्यांत गणलेला होता, असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्याठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्या विषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.”›

‹तथापि ‘त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.›

कारण, “त्याचे एकही हाड मोडणार नाही,” हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून या गोष्टी झाल्या.