TSK

TSK · गण 11:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “परमेश्वराच्या हातून आम्हांला मिसर देशामध्येच मरण आले असते तर बरे झाले असते, कारण तेथे आम्हांला खावयास लागणारे सर्व प्रकारचे अन्न भरपूर होते; परंतु तुम्ही आम्हांला येथे रानात उपासाने मारावे म्हणून आणले आहे.”

¶ त्याकाळी कोणा एका इस्राएली स्त्रीला मिसरी पुरुषापासून झालेला एक मुलगा होता; तो इस्राएली होता व इस्राएल लोकांप्रमाणे वागत होता. तो छावणीत एका इस्राएल मनुष्याशी भांडू लागला.

¶ त्या रात्री सर्व मंडळीने गळा काढून जोरजोरात आक्रोश केला आणि रडले.

हा नियम ऐकताच विदेशी लोकांस इस्राएलातून वेगळे करण्यात आले.

पहा, त्याने खडकावर प्रहार केला तेव्हा पाणी उसळून बाहेर पडले, आणि पाण्याचे प्रवाह भरून वाहू लागले. पण भाकरही देऊ शकेल काय? तो आपल्या लोकांसाठी मांसाचा पुरवठा करील काय?”

तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त परिधान करा आणि देहवासनांसाठी काही तरतुद करू नका.

फसू नका, “वाईट सोबतीने चांगल्या सवयी बिघडतात.”