TSK

TSK · गण 12:10

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू लावत असे. मोशेने त्यास दर्शनमंडप असे नाव दिले होते; ज्या कोणाला परमेश्वरास काही विचारावयाचे असेल तो छावणीबाहेरील दर्शनमंडपाकडे जाई.

याजकाने त्यास तपासावे; आणि जर त्याच्या कातडीच्या पांढऱ्या चट्ट्यावर सूज आली असेल व तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या जागेवरील मांस हुळहुळे झाले असेल तर

मिसरमधून बाहेर पडल्यावर पुढच्या प्रवासात मिर्यामचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले ते चांगले लक्षात असू द्या.

परमेश्वराने राजाला दु:ख दिले आणि अजऱ्याला कुष्ठरोग होऊन त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तो वेगळा घरी राहिला. राजाचा मुलगा योथाम त्याच्या घरावर अधिकारी होऊन तोच देशातील लोकांचा न्यायनिवाडा करु लागला.

परमेश्वर देवाचे गौरव करुबावर उठून घराच्या उंबरठ्यावर आले, आणि वेशी परमेश्वर देवाच्या प्रकाशाने चमकू लागल्या. त्याने घर भरुन गेले आणि वेशी देवाच्या गौरवाने प्रकाशू लागल्या.

जरी त्यांच्या मुलांचे पालन पोषण होऊन ती मोठी झाली तरी मी ते हिरावून घेणार यासाठी की त्यामध्ये कोणी राहू नये. मी त्यांच्यापासून वळून जाईल तेव्हा त्यांच्यावर हाय हाय!