TSK

TSK · गण 13:17

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

त्यानंतर अब्राम पुन्हा पुढच्या प्रवासास निघाला व दक्षिणेकडील नेगेब वाळवंटाकडे गेला.

सिद्दीम खोऱ्यात पूर्ण डांबराने भरलेले खड्डे होते आणि सदोम व गमोराचे राजे पळून जाताना त्यामध्ये पडले, जे राहिले ते डोंगराकडे पळून गेले.

अमालेकी लोक नेगेबमध्ये राहतात. हित्ती, यबूसी आणि अमोरी डोंगराळ भागात राहतात. आणि कनानी लोक समुद्राजवळ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात.”

तेव्हा तेथील अमोरी तुमच्याशी सामना करायला सामोरे आले. आणि चवताळलेल्या मधमाश्यांप्रमाणे त्यांनी सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हास पिटाळून लावले.

या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशांचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण यातील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे यांना काबीज केले; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक जिवंत गोष्टीचा त्याने समूळ नाश केला.

नंतर यहूदाचे लोक डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि पश्चिमेकडील तळवटीच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या कनान्यांशी लढावयाला खाली गेले.

यहूदाच्या लोकांबरोबर परमेश्वर होता आणि त्यांनी डोंगराळ प्रदेश ताब्यात घेतला, पण खोऱ्यात राहणाऱ्या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना घालवून देणे त्यांना जमेना.