TSK

TSK · गण 19:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ त्याने परमेश्वरासाठी वेगळे होण्यासाठी स्वत:ला पुन्हा समर्पित करावे. त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणावा. त्याने आपल्याला अशुद्ध करून घेण्याच्या पूर्वीचे दिवस मोजू नयेत. कारण तो देवासाठी वेगळा झाला तेव्हा तो अशुद्ध झाला होता.

¶ परंतु जर कोणी शुद्ध आहे आणि दूरच्या प्रवासात नाही, पण जो वल्हांडण सण पाळत नाही तर त्यास आपल्या लोकातून काढून टाकावे कारण त्याने परमेश्वराचे अर्पण त्याच्या नेमलेल्या वेळी केले नाही. त्या मनुष्याने आपले पाप वहावे.

शुद्ध मनुष्याने एजोबाची काठी घेऊन ती पाण्यात बुडवावी. नंतर ते पाणी तंबूवर, भांड्यावर आणि मंडपातल्या मनुष्यांवर शिंपडावे. जो प्रेताला हात लावली त्याच्या बाबतीत हे करावे. तुम्ही हे प्रत्येकाला करा. जो युद्धात कबरेला हात लावील किंवा मरण पावलेल्या मनुष्याच्या हाडांना हात लावील त्याच्या बाबतीत हे करा.

जे काही अग्नीत टिकेल ते तुम्ही अग्नीत घालून काढा ते शुद्ध होईल: तरी अशुद्धी दूर करण्याच्या पाण्याने ते शुद्ध करावे आणि जे काही अग्नीत टिकणार नाही ते पाण्याने धुवावे.

कारण जो पाप जाणत नव्हता त्यास त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्याठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.

¶ म्हणून अगदी असाच महायाजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाप्यांपासून वेगळा केलेला आहे. त्यास आकाशाहूनही उंच केलेले आहे.