TSK

TSK · गण 27:16

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा मृत्यू आता समीप आला आहे. यहोशवाला घेऊन निवासमंडपात ये. म्हणजे मी त्यास आज्ञा देईन.” तेव्हा मोशे व यहोशवा दर्शनमंडपामध्ये गेले.

परमेश्वराने माझे वडिल दाविदाला वचन दिले होते. परमेश्वराने सांगितले होते, ‘तुझ्यानंतर मी तुझ्या मुलाला राजा करीन. तो माझ्या सन्मानार्थ मंदिर बांधील’ त्याप्रमाणे माझ्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ मंदिर बाधण्याची माझी योजना आहे.

मग मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, जो त्यांना पाळील, म्हणजे ती घाबरणार नाहीत व भयभीत होणार नाहीत. त्यातील एकही हरवणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो.

मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन व तो त्यांना चारील आणि माझा सेवक दावीद, ह्याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन. तो त्यांस चारील; तो त्यांच्यावर मेंढपाळ होईल.

‹म्हणून पिकाच्या धन्याकडे प्रार्थना करा की, त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत.”›

तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हास दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या, कळपाची काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हास दिलेले आहे, तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे, ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.

तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा; भाग पडते म्हणून नाही पण देवाला आवडेल असे, स्वेच्छेने, द्रव्यलोभासाठी नाही पण उत्सुकतेने करा