TSK

TSK · गण 3:16

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तेव्हा इस्राएलाच्या मुलांनी तसे केले. योसेफाने त्यांना फारोने आज्ञा दिल्याप्रमाणे गाड्या दिल्या, आणि त्यांच्या प्रवासाकरिता भरपूर अन्नसामग्री दिली.

मोशेने खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या मुलांना दिले. जशी परमेश्वराने त्यास आज्ञा केली होती ती प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या वचनानुसार मोशेने केली.

¶ कहाथी वंशापैकी जे दर्शनमंडपामध्ये पवित्र सेवा करीत त्यांची गणती करण्यात आली. मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.

¶ मरारी वंशापैकी ज्या पुरुषांची गणती मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे केली, ते इतके भरले.

तेव्हा लेवी वंशातील याजकांनी यावेळी तिथे असावे. आपली सेवा करून घ्यायला आणि आपल्या वतीने लोकांस आशीर्वाद द्यायला तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांची याजक म्हणून निवड केली आहे. प्रत्येक वादात किंवा मारामारीत ते निवाडा करतील.