TSK

TSK · नीति 22:17

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.

ज्ञानाचे ऐकशील. आणि ज्ञानाकडे तुझे मन लावशील.

त्यांनी मला शिकवले आणि मला म्हणाले, “तुझे मन माझी वचने घट्ट धरून ठेवो; माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत राहा.

माझी शिकवण ऐका आणि शहाणे व्हा; दुर्लक्ष करू नका.

मी माझे मन अभ्यास आणि निरीक्षण याकडे वळवले. आणि ज्ञान आणि वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण शोधले, आणि मला हे कळाले की, दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे. आणि मूर्खासारखे वागणे हा शुद्ध वेडेपणा आहे.

¶ जेव्हा ज्ञान समजायला आणि जे कार्य पृथ्वीवर चालले आहे ते पाहायला जेव्हा मी आपले मन लावले. कारण अहोरात्र ज्याच्या डोळ्यास डोळा लागत नाही असेही लोक असतात.

तो बोलत आहे तो, पाहा, इतक्यात, एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर सावली केली आणि त्या मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.”