TSK

TSK · नीति 24:14

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

होय, त्याकडून तुझ्या सेवकाला चेतावनी मिळते. ते पाळण्याने उत्तम प्रतिफळ मिळते.

तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो.

ज्ञान तुझ्या हृदयात प्रवेश करील, आणि तुझ्या आत्म्याला ज्ञान आनंदित करील.

कारण ती जर तू आपल्या अंतर्यामात ठेवशील, आणि ती सर्व तुझ्या ओठावर तयार राहतील. तर किती बरे होईल.

मला तुझी वचने सापडली, आणि ती मी खाल्ली. तुझे वचन माझ्या हृदयाचा आनंद आणि हर्ष अशी झाली. कारण तुझे नाव मला ठेवले आहे, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.

परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे बारकाईने पालन करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल.