TSK

TSK · नीति 7:26

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ शौल आणि दावीद यांच्या घराण्यात चाललेल्या लढायांमध्ये शौलाच्या सैन्यातील अबनेरचे बळ वाढत चालले.

असे असताना तू परमेश्वराची आज्ञा का मोडलीस? त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केलेस? उरीया हित्तीला तू तलवारीने मारलेस, आणि त्याच्या पत्नीचा स्वतःची पत्नी म्हणून स्विकार केलास. होय, अम्मोन्यांच्या तलवारीने तू त्याचा वध करवलास.

अशा विवाहांमुळेच शलमोनाच्या हातून पाप झाले. पुष्कळ राष्ट्रात त्याच्यासारखा कोणी राजा नव्हता. तो आपल्या देवाला प्रिय होता आणि देवाने सर्व इस्राएलावर त्यास राजा केले. पण अन्य जातीच्या स्त्रियांनी त्यालाही पापात पाडले.

जखमा व अप्रतिष्ठा त्यास प्राप्त होतील, आणि त्याची लज्जा कधीही धुतली जाणार नाही.

ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केले तसे व्यभिचार आपण करू नये. त्याचा परिणाम असा झाला की, एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले.

¶ माझ्या प्रियांनो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हास विनंती करतो की, आत्म्याबरोबर लढाई करणार्‍या दैहिक वासनांपासून दूर रहा.