TSK

TSK · नीति 8:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

“ईयोब, मी तुला विनंती करतो, माझे बोलने ऐक. माझे सर्व शब्दांकडे लक्ष दे.

माझे मुख ज्ञान बोलेल, आणि माझ्या हृदयातील विचार समंजसपणाचे असणार.

मी तुम्हास चांगला सल्ला देतो; माझी शिकवण कधीही विसरु नका.

मी तुझ्यासाठी शिक्षण व ज्ञान ह्यातल्या तीस म्हणी लिहिल्या नाहीत काय?

त्याने आपले तोंड उघडले व त्यांना शिकवले. तो म्हणाला;

यासाठी की, संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, दाखले सांगायला मी आपले तोंड उघडीन; जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलून दाखवीन.

जे रहस्य युगानुयुग व पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते परंतु आता, त्याच्या पवित्रजनांना प्रकट झाले आहे, ते हे वचन आहे.