TSK

TSK · रोम 1:23

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तुम्ही आपणासाठी कोरीव मूर्ती करु नका, वर आकाश, खाली पृथ्वी किंवा पाणी यातील कोणाचीही प्रतिमा करु नका.

त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत, पण त्यांना बघता येत नाही.

तर मग तुम्ही देवाची तुलना कशाशी कराल? तर त्याची तुलना कोणत्या प्रतिमेशी करणार?

सुतार लाकडाचे माप दोरीने रेष मारून करतो आणि गेरूने आखणी करतो. त्याच्या हत्याराने त्यास आकार देतो आणि कंपासाने त्यावर खुणा करतो. ती पवित्रस्थानात रहावी म्हणून त्यास मनुष्याच्या आकाराची, आकर्षक मनुष्यासारखी घडवून तयार करतो.

मग मी बघण्यासाठी गेलो, आणि पाहा! तेथे सर्व प्रकारचे सरपटणारे आणि अशुद्ध प्राणी होते, इस्राएल घराण्याच्या सर्व मूर्ती यांची चित्रे यरूशलेमेच्या भितींवर टांगलेल्या होत्या.

त्यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले आणि निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन.

कारण परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला. तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तीपूजेत आपल्या मार्गाने गेलात.