TSK

TSK · रोम 3:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील. त्याच्या आत त्याचे सर्पाच्या विषासारखे जहर होईल.

परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको.

अरे कपटाने कार्य करणाऱ्या, तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी नाशाची योजना करते.

त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते; त्यांच्या ओठाखाली विषारी सर्पाचे विष आहे.

त्यांचे भाते उघड्या थडग्यांप्रमाणे आहेत. ते सर्व सैनिक आहेत.

तुम्ही खोटा दृष्टांत पाहिला नाही का? आणि खोटे भाकीत केले नाही का? “तुम्ही म्हणता की अमुक तमुक परमेश्वर देव जाहीर करीत आहे” जेव्हा मी तसले काही बोललो नाही.

¶ ‹अहो परूश्यांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात. त्या वरून चांगल्या दिसतात पण आतून मरण पावलेल्या मनुष्यांच्या हाडांनी भरल्या आहेत.›

त्याचप्रमाणे जीभ एक लहान अवयव आहे आणि मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग किती मोठे रान पेटवते.