TSK

TSK · सफ 2:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

अश्शूरानेही त्यांच्याशी करार केला आहे; ते लोटाच्या वंशजांना मदत करीत आहेत.

सीयोन डोंगर व यरूशलेम यासंबंधीचे आपले कार्य संपले तेव्हा प्रभू म्हणेल, अश्शूरच्या राजाच्या उन्मत्त हृदयाचे भाषण व त्याच्या गर्वीष्ठ दृष्टीला मी शिक्षा करीन.

त्यादिवशी, असे होईल की प्रभू आपल्या अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व भूसमुद्रातील त्याच्या उर्वरीत लोकांस परत मिळविण्यासाठी आपले हात लांब करील.

तो आपल्या तलवारीच्या बळावर अश्शूरींवर आणि निम्रोदच्या प्रदेशांमध्ये तलवारीने घात करेल. जेव्हा ते आमच्या देशात येतील आणि आमच्या सीमा पायदळी तुडवतील. तेव्हा हा पुरुष त्याच्यापासून आम्हाला सोडवीन.

निनवे रिकामी आणि ओसाड झाली आहे. तिच्या हृदयाचे पाणी झाले आहे, पाय लटपटत आहेत, आणि प्रत्येकजण यातनेत आहे; त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडले आहेत.

तुला आग खाऊन टाकील, आणि तलवार तुला कापून काढील. ती तुला चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे खाऊन टाकील. चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे आपली संख्या वाढीव, झुडींनी येणाऱ्या टोळाप्रमाणे बहुतपट हो.

मी त्यांना मिसरमधून परत आणीन व अश्शूरमधून मी त्यांना गोळा करीन. मी त्यांना गिलादाच्या व लबानोनाच्या नगरात आणीन. ते त्या जागेत मावणार नाहीत तोपर्यंत मी त्यांना आणीन.”