¶ गायनसेवा करणाऱ्यांची नावे, कहाथ घराण्यातील वंशज, हेमान हा गवई. हा योएलाचा पुत्र. योएल शमुवेलचा पुत्र.
TSK
TSK · 1 इति 16:41
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मनश्शेच्या अर्ध्या वंशातील अठरा हजार लोक दावीदास राजा करण्यास आले. त्यांची नावे नोंदण्यात आली.
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे. कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
¶ दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:
गायन आणि वादन एका सुरात चालले होते. एका सुरात त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले आणि त्यास धन्यवाद दिले. कर्णे, झांजा आणि इतर वाद्या सोबत त्यांनी उच्च स्वरात परमेश्वराची स्तुती केली. त्यांच्या गायनाचा आशय असा होता: “परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याची खरी प्रीती सर्वकाळ राहते.” तेव्हा परमेश्वराचे सर्व मंदिर मेघाने भरुन गेले.
यहोशाफाटाने लोकांस प्रोत्साहन दिले व सूचना दिल्या. परमेश्वराचे स्तवन करणारी माणसे त्याने निवडली. परमेश्वर पवित्र आणि कल्याणकारी आहे म्हणून त्याचे स्तवन करण्यासाठी त्याने या गायकांना नेमले. त्यांनी सैन्यासमोर उभे राहून स्तुतिगीते म्हटली. ते म्हणाले, “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची प्रीती सर्वकाळ आहे.”
शिवाय त्यांनी मंदिरातल्या सेवा चाकरीसाठी दोनशे वीस जणांना पाठवले. या लोकांच्या पूर्वजांना दावीदाने आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी लेवीचे मदतनीस म्हणून निवडले होते. त्या सर्वांची नावे यादीत लिहिलेली होती.
तेथे पुन्हा आनंद व हर्षाचा शब्द ऐकू येईल. नवऱ्याची व नवरीची वाणी ऐकू येईल, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सर्वकाळची आहे. असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात उपकारस्तुतीचे अर्पण आणतील त्यांचा आवाज पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास परत उलटवून सुरुवातीला जसे होते तसे करीन, असे परमेश्वर म्हणतो.