TSK

TSK · 1 इति 19:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा अम्मोनी लोक बाहेर पडून युध्दाला सज्ज झाले व नगराच्या वेशीपाशी त्यांनी व्यूह रचला, सोबा आणि रहोब येथील अरामी तसेच माकाचे व तोबाचे सैनिक हे सर्व मिळून स्वतंत्रपणे युद्धासाठी उभे राहिले.

¶ बेन-हदाद अरामाचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बत्तीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले.

अबीयाच्या सैन्यात निवडक चार लाख बलवान व धाडसी योध्दे होते. अबीयाने लढाईत त्यांचे नेतृत्व केले. यराबामाकडे आठ लाख सैनिक होते. यराबाम अबीयाशी युध्द करायला सज्ज झाला.

आणि जो न्याय करत बसतो त्यास तो न्यायाचा आत्मा आणि जे वेशीजवळ लढाई मागे हटवतात त्यांना तो पराक्रम असा होईल.

त्यांच्या उड्या मारण्याचा आवाज, पर्वतावरून जाणाऱ्या रथांसारखा, धसकट जाळणाऱ्या आग्नीसारखा, युध्दासाठी सज्ज झालेल्या बलवानासारखा आहे.