तुम्हास मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हास नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल.
TSK
TSK · 1 इति 21:12
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ मी तुमच्यावर तलवार आणीन ती करार मोडल्याचा बदला घेईल. तुम्ही आपआपल्या नगरांत जमा व्हाल, तेव्हा मी तेथे तुमच्यावर आजार पाठवीन, आणि तुम्ही तुमच्या शत्रुच्या बळामुळे पराभुत व्हाल.
¶ पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे जर तुम्ही ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व शाप तुमच्यामागे लागतील:
तुम्ही तुमच्या शत्रूपुढे मार खाल असे परमेश्वर करील. शत्रूवर तुम्ही एका दिशेने चढाई कराल आणि सात दिशांनी पळ काढाल. तुमच्यावरील संकटे पाहून पृथ्वीवरील इतर लोक भयभीत होतील.
तुमच्या गुडघ्यांवर, पायांवर, पावलांपासून डोक्यापर्यंत सर्व शरीरावर ठसठसणारी व बरी न होणारी गळवे उठतील. अशा रीतीने परमेश्वर तुम्हास शासन करील.
¶ दावीदाच्या कारकिर्दीत एकदा दुष्काळ पडला. हा दुष्काळ तीन वर्षे टिकला तेव्हा दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली परमेश्वराने सांगितले, “शौल आणि त्याचे खुनी रक्तपिपासू घराणे यावेळच्या दुष्काळाला जबाबदार आहेत. शौलने गिबोन्यांना मारले म्हणून हा दुष्काळ पडला.”
¶ गिलाद येथील तिश्बी येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीया हा एक संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या जीविताची शप्पथ घेवून मी हे सांगतो की, येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”
त्या रात्री परमेश्वराचा दूत बाहेर पडला आणि त्यांने अश्शूरांच्या छावणीतली एक लक्ष पंच्याऐंशी हजार माणसे मारली. सकाळी लोक उठून पाहतात तर सर्वत्र प्रेतांचा खच पडलेला.
किंवा अंधारात फिरणाऱ्या मरीला किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस.
नाश करणारे सर्व वाळवंटातील त्या उजाड ठिकाणाहून आले आहेत, कारण परमेश्वराची तलवार एका सीमेपासून देशाच्या तुसऱ्या सीमेपर्यंत खाऊन टाकीत आहे. कोणत्याही जिवंत प्राण्यांसाठी देशात सुरक्षितता नाही.
हे परमेश्वराच्या तलवारी, तू किती वेळपर्यंत शांत राहणार? तू परत आपल्या म्यानात जा. थांब आणि शांत रहा.
जर मी देशावर क्रोध मरी पाठवीली, त्यांचे रक्त सांडल्यामुळे मनुष्य आणि पशू हे नष्ट करीन.
‹मी तुम्हास खरे सांगतो, इस्राएलात एलीयाच्या काळात पुष्कळ विधवा होत्या, जेव्हा साडेतीन वर्षापर्यंत आकाशातून पाऊस पडला नाही आणि सर्व प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता.›
¶ आणि त्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोनावर उभे राहीलेले पाहीले, त्यांनी पृथ्वीतील चार वाऱ्यास असे घट्ट धरून ठेवले होते की पृथ्वीवर व समुद्रावर आणि कोणत्याही झाडावर वारा वाहू नये.