“माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता ऊठ, तू आणि हे सर्व लोक असे तुम्ही यार्देन, ओलांडून जो देश मी इस्राएल लोकांस, देत आहे त्यामध्ये जा.
TSK
TSK · 1 इति 22:16
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”
दबोरा बाराकाला म्हणाली, “ऊठ, आजच परमेश्वराने सीसरावर तुला विजय दिला आहे; देव तुझ्यापुढे निघाला आहे की नाही?” मग बाराक व त्याच्या पाठोपाठ दहा हजार लोक ताबोर डोंगरावरून खाली उतरले.
आणखी दावीदाने म्हटले, “ज्या परमेश्वराने सिंह व अस्वल यांच्या पंज्यापासून मला राखिले तो या पलिष्ट्याच्या हातातून मला राखील.” मग शौलाने म्हटले, “जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो.”
“आता मी जगाच्या रीतीप्रमाणे जाणार आहे. तर तू हिमंत धर, खंबीर, जबाबदार पुरुष हो.
¶ दावीदाने दरवाजांसाठी खिळे आणि बिजागऱ्यासाठी लागणारे लोखंड पुरवले व त्याने वजन करता येणार नाही इतके पितळ,
¶ पाहा, परमेश्वराच्या मंदिरासाठी मी खूप कष्टाने एक लक्ष किक्कार सोने आणि दहा लक्ष किक्कार रुपे आणि पितळ व लोखंड यांचा मोठ्या प्रमाणात साठा करून तयारी केली आहे. मी दगड, लाकूडसुध्दा पुरवले आहे. तू या सर्वात अधिक भर घाल.
माझ्या देवाच्या मंदिरासाठी मी माझ्या शक्तीने सर्वोत्तम सोन्याच्या वस्तूंसाठी सोने व चांदीच्या वस्तूसाठी चांदी, पितळेच्या वस्तूसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड, लाकडी सामानासाठी लाकूड, जडावाच्या कामासाठी गोमेद, पाषाण, विविधरंगी मौल्यवाने रत्ने आणि संगमरवरी दगड हे ही विपुलतेने दिले आहे.
तुम्हास या लढाईत लढावे असे लागणारच नाही. आपल्या जागी ठाम उभे राहा. परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हास आढळून येईल. यहूदा आणि यरूशलेम लोकहो, भिऊ नका, चिंता करु नका. परमेश्वर तुमच्यासोबत आहे. तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा.”
कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे “हे झोपलेल्या जागा हो, आणि मरण पावलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”
आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तीमान आहे.