TSK

TSK · 1 इति 22:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्यांना शलमोन राजाने मोठे, मौल्यवान चिरे मंदिराच्या पायासाठी म्हणून कापायला सांगितले. ते फार काळजीपूर्वक कापण्यात आले.

या सर्व इमारतींच्या बांधकामात किंमती दगडी चिरे वापरले होते. पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते. पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता. अंगणाभोवतालच्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या.

दगड फोडणारे, दगडाचे घडीव चिरे बनवणारे यांना देण्यासाठी तसेच लाकूड विकत घेणे दगड घडविणे आणि परमेश्वराच्या मंदिरासाठी दुरुस्तीचे इतर सामान विकत घेण्यासाठी हे पैसे वापरले जात.

¶ नंतर सोराचा राजा हिराम याने दावीदाकडे दूत पाठवले आणि याखेरीज त्याने गंधसरूचे लाकडे, गवंडी, सुतार दाविदासाठी त्याने घर बांधले.

लबानोनातून तुम्हास हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओंडक्यांचे तराफे करून आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोहोचते करु. तेथून ते तुम्ही यरूशलेमेला न्यावे.”

इस्राएल लोक राहत असलेल्या प्रदेशात अनेक परके लोकही होते. ते म्हणजे हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी त्यांना शलमोनाने वेठबिगार केले.

परदेशी उभे राहून तुमचे कळप चारतील आणि परदेशीयांची मुले तुमच्या शेतांत आणि द्राक्षमळ्यांत काम करतील.

यामुळे तुम्ही आता परके आणि विदेशी नाही. तर त्याऐवजी तुम्ही पवित्रजनांच्या बरोबरचे सहनागरीक आणि देवाचे कुटुंबीय आहात