TSK

TSK · 1 इति 5:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वर तिला म्हणाला, “दोन राष्ट्रे तुझ्या गर्भाशयात आहेत आणि तुझ्यामधून दोन वंश निघतील. एक वंश दुसऱ्यापेक्षा बलवान असेल आणि थोरला धाकट्याची सेवा करील.”

इस्राएल त्या देशात राहत होता, त्या वेळी रऊबेन, आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी निजला, हे इस्राएलाने ऐकले. याकोबाला बारा पुत्र होते.

इस्राएलाने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासमोर माझे वडील, अब्राहाम व इसहाक चालले, ज्या देवाने माझ्या सर्व आयुष्यभर मला चालवले आहे,

¶ मोशे व अहरोन यांच्या पूर्वजांपैकी प्रमुख पुरुषांची नावे अशीः इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन. त्याची मुले हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी. हे रऊबेनाचे कुळ.

¶ जो आपल्या वडिलाच्या पत्नीपाशी जातो तो आपल्या बापाची लाज उघडी करतो! तो मनुष्य व त्याच्या बापाची पत्नी त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.

¶ कोरह इसहारचा मुलगा, इसहार कहाथचा मुलगा आणि कहाथ लेवीचा मुलगा, दाथान आणि अबीराम भाऊ होते आणि ती अलीयाबाची मुले होती. ओन पेलेथचा मुलगा होता. दाथान, अबीराम आणि ओन रऊबेन वंशातील होते. यांनी काही माणसे जमवली.

त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्र नावडतीचा मुलगा असला तरी त्याचा स्वीकार केला पाहिजे. तसेच आपल्या एकंदर मालमत्तेतील दुप्पट वाटा त्यास दिला पाहिजे. कारण तो ज्येष्ठ पुत्र आहे. व त्यालाच जेष्ठपणाचा हक्क आहे.

प्रथम जन्मलेल्या गोऱ्हासारखा त्याचा प्रताप आहे. त्याचे शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे आहेत. ते लोकांवर चढाई करून त्यांना पृथ्वीच्या सीमेपर्यंत ढकलतील. असे मनश्शेचे हजारो आणि एफ्राइमचे लाखो आहेत.”

ते आले तेव्हा असे झाले कि, त्याने अलियाबास पाहून स्वतःला म्हटले, “परमेश्वराचा अभिषिक्त निःसंशय हाच आहे.”

मरारीच्या वंशातला होसा. शिम्रीला ज्येष्ठपद दिले होते. हा जन्माने ज्येष्ठ नव्हता, पण त्याच्या पित्याने त्यास मुख्य केले होते.

¶ ख्रिस्त अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे आणि सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे.