TSK

TSK · 1 पेत्र 5:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

यानंतर शमशोन आणि त्याचे आईबाप खाली तिम्ना येथे जात होते, आणि तिम्नातल्या द्राक्षमळ्यांपर्यंत ते पोहचले, तेव्हा तेथे तरुण सिंह गर्जना करून आला आणि त्याच्या अंगावर येऊ लागला.

¶ एक दिवस असा आला कि त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहीले, त्यांच्यामध्ये सैतानही तेथे आला.

तरुण सिंह आपल्या भक्ष्यासाठी गर्जना करतात, आणि देवाकडे आपले अन्न मागतात.

राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, पण त्याचा उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे.

त्यांची गर्जना जणूकाय सिंहाच्या गर्जनेसारखी असणार, तरूण सिंहासारखे ते गर्जना करतील. ते गर्जतील आणि आपल्या भक्ष्याला पकडून खेचत नेतील, वाचवणारा कोणीच नसेल.

मला नितीमान ठरवणारा परमेश्वर जवळ आहे. मला कोण विरोध करणार? उभे राहा आणि एक दुसऱ्यास धैर्याने तोंड द्या.

“बाबेली जमून तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील. ते सिंहाच्या छाव्याप्रमाणे गुरगुरतील.

तुझ्यामध्ये असलेल्या संदेष्टयांच्या विरुध्द कारस्थान तुझ्यात आहे, जसा गर्जना करणारा सिंह आपल्या भक्षाला फाडून टाकतो, ते जीवन संपवून टाकतो आणि त्याने तिच्यात अनेकांना विधवा बनवले.

ते माझ्यामागे चालतील मी परमेश्वर सिंहासारखी गर्जना करेन मी खरोखर गर्जेन आणि लोक पश्चिमेकडून थरथरत येतील.

परमेश्वर देव सियोनेतून गर्जना करील, आणि आपला आवाज यरूशलेमेतून उंचावील. आकाश व पृथ्वी कापतील पण परमेश्वर आपल्या लोकांस सुरक्षित स्थान, आणि इस्राएलाच्या लोकांस तो दुर्ग होईल.

शिकार मिळाली नाही तर जंगलात सिंह गर्जना करील काय? तरुण सिंहाने काही धरले नसेल तर त्याच्या गुहेतून तो गुरगुरेल काय?

¶ देवदूताने मला दाखवले, मुख्य याजक यहोशवा परमेश्वराच्या दूतापुढे उभा होता आणि सैतान त्यास दोष करण्यासाठी त्याच्या उजवीकडे उभा होता.

¶ मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्यांस अरण्यात नेले.

‹ते पेरणारा शत्रू हा सैतान आहे; कापणीही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत;›

‹पण जर तो दुष्ट दास आपल्या मनात असे म्हणेल की, माझा धनी विलंब करीत आहे, ›

‹पण जर तो नोकर मनात म्हणतो, ‘माझा मालक येण्यास फार उशीर करत आहे,’ आणि मग तो त्याच्या स्त्री व पुरूष नोकरांना मारहाण करायला व खाण्यापिण्यास सुरुवात करतो व झिंगतो, ›

‹यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा.”›

‹तुम्ही आपला पिता सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या पित्याच्या वासनांप्रमाणे करू पाहता. तो प्रारंभापासून मनुष्य घात करणारा होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा पिता आहे.›

सैतानाला संधी देऊ नका.

ह्यावरून आपण इतरांप्रमाणे झोप घेवू नये, तर जागे व सावध रहावे.

तथापि मुलांना जन्म देण्याच्या वेळेस तिचे रक्षण होईल, ती मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रपण यांमध्ये राहिल्यास हे होईल.

त्याचप्रमाणे, स्त्रियांनीही गंभीर असावे, त्या चहाडखोर नसाव्यात. तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात.

तर अतिथिप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा; मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी,

आणि आपल्यातील तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या पतींवर व मुलांवर प्रेम करावे.

ती आपल्याला असे शिकवते की, अभक्तीचा व जगीक वासनांचा त्याग करून, आपण या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले पाहिजे.

¶ म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा.

जो पाप करतो तो सैतानाचा आहे कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.

म्हणून स्वर्गांनो आणि त्यामध्ये राहणाऱ्यांनो, आनंद करा पृथ्वी आणि समुद्र ह्यावर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान खाली तुमच्याकडे मोठ्या रागाने आला आहे. कारण आपणाला थोडकाच काळ राहिला आहे, हे तो जाणतो.

आणि त्यांना फसविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंघकाच्या सरोवरात टाकण्यात आले; तो पशू व तो खोटा संदेष्टा हे; तेथेच असून ते रात्रंदिवस सदासर्वकाळ पीडा भोगतील.