परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वरास, आपल्या देवाला पूर्ण जिवेभावे शरण गेला तर तो तुम्हास पावेल.
TSK
TSK · 1 शमु 7:3
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तुम्ही फक्त तुमचा देव परमेश्वर याचेच भय धरा व त्याचीच सेवा करा, त्याच्याबद्दल आदर बाळगा. त्यास धरुन राहा, शपथ वाहाताना त्याच्याच नावाने शपथ घ्या.
तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांबाळासह संपूर्ण मनाने व संपुर्ण जीवाने तुमचा देव परमेश्वर ह्याच्याकडे वळाल आणि मी आज दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करून त्याची वाणी ऐकाल.
“असे आहे तर आता तुमच्यामध्ये जे परके देव असतील, ते तुम्ही दूर करा, आणि आपले अंतःकरण इस्राएलाचा देव परमेश्वर याकडे लावा.”
परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल आणि अष्टारोथ यांची उपासना केली;
तेव्हा त्यांनी आपल्यामधून परके देव दूर करून परमेश्वराची उपासना केली, आणि इस्राएलाच्या दुःखामुळे त्याच्या मनाला खेद झाला.
बंदी करून नेलेल्या शत्रुंच्या देशात असताना ते जर अंत:करणपूर्वक तुझ्याकडे वळले आणि तू त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीच्या दिशेने, तू निवडलेल्या या नगराच्या दिशेने आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने त्यांनी प्रार्थना केली तर
नबाटचा मुलगा यराबाम याने बांधलेली बेथेलमधली वेदी आणि उच्चस्थानेही योशीयाने उध्वस्त केली. या यराबामाने इस्राएलाला पाप करायला लावले होते. योशीयाने त्या बांधकामांची मोडतोड करून त्याची अगदी माती केली. अशेरा स्तंभही त्याने जाळून टाकला.
¶ हे शलमोना, माझ्या पुत्रा, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. पूर्ण अंतःकरणाने व मनोभावाने त्याची सेवा कर. तू हे कर कारण परमेश्वर सर्वाची अंत:करणे पारखतो आणि आपल्या प्रत्येकाच्या विचाराच्या सर्व कल्पना त्यास कळतात. जर तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल, पण जर तू त्यास सोडशील, तर तो तुझा कायमचा त्याग करील.
पण उच्चस्थाने काढण्यात आली नव्हती. लोकांनीही आपले मन आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराकडे वळवले नव्हते.
परंतु तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी देवाच्या दिशेने उचलले पाहिजेस.
मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण त्याच्या जिव्हेचे उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे.
परमेश्वर असे म्हणतो, “हे इस्राएल जर तू परत येशील, माझ्याकडे परत वळशील. तू आपले तिरस्करणीय गोष्टी माझ्यासमोर दूर करशील आणि जर तू भटकणार नाहीस,
तू केलेले सर्व दुष्कर्म तुझ्यापासून दूर कर, तुझ्यासाठी नवे हृदय नवा आत्मा सिध्द केला आहे, यास्तव इस्राएलाच्या घराण्या तू का मरावे?
हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये, तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे.
येशूंनी त्यास म्हटले, ‹“अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, › ‹‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर› ‹आणि त्यालाच नमन कर.’”›
‹हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात.› ‹पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.›
‹देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”›