TSK

TSK · 2 इति 11:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

आता देवाचा एक पुरुष एलीकडे येऊन त्यास म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या पूर्वजांचे घराणे मिसरात फारोच्या दास्यात राहत असता मी त्यास प्रगट झालो नाही काय?

आपल्या पित्याच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजकवर्गाच्या नेमणुका केल्या लेवींना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीते म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवाकार्ये बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवीची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वरास मानणाऱ्या दाविदाने अशाच सूचना दिल्या होत्या.

शमाया हा संदेष्टा आणि इद्दो हा द्रष्टा यांच्या इतिहासात रहबामाने आपल्या कारकीर्दीत केलेल्या सर्व गोष्टींची पूर्ण हकिकत आहे. शमाया आणि इद्दो वंशाळींचा इतिहास लिहीत. रहबाम आणि यराबाम या दोघांमध्ये नित्य लढाया होत.