तीन दिवसानंतर योसेफ त्यांना म्हणाला, “मी देवाला भितो, म्हणून मी सांगतो तसे करा आणि जिवंत राहा.
TSK
TSK · 2 इति 19:7
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मोशेने इस्राएल लोकांतून चांगले लोक निवडले आणि त्यांना हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास व दहा दहांवर नायक म्हणून नेमले.
कारण परमेश्वर तुमचा देव आहे, तो देवांचा देव व प्रभूंचा प्रभू आहे. तो महान व भययोग्य परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्यास सर्वजण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही.
तो माझा दुर्ग आहे आणि त्याची कृती परिपूर्ण! कारण तो, त्याचे सर्व मार्ग, उचित आहेत! देवच खरा आणि विश्वासू न्यायी आणि सरळ आहे.
पण माझ्या आधी सतेवर असलेले राज्यपाल लोकांवर भारी बोजा लादित व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षरस घेऊन आणखी प्रत्येकी चाळीस शेकेल रुपे घेत असत. त्यांचे सेवक देखील लोकांवर जुलूम करीत असत. पण मी तसे केले नाही कारण मला देवाचे भय होते.
तुम्ही जर एखादा मनुष्य महत्वाचा आहे म्हणून न्यायालयात त्याची बाजू घेतलीत तर देव तुमच्यावर टीका करेल हे तुम्हास माहीत आहे का?
कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल? आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल?
तो, नीतीने वागतो व सत्य बोलतो, जुलूमजबरी करून मिळणारा लाभ तुच्छ लेखतो; जो लाच नाकारतो, घातपातांचा कट करीत नाही व दुष्कृत्याकडे पाहत नाही.
परूश्यांनी त्यांचे शिष्य हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हास माहीत आहे की आपण खरे आहात आणि तुम्ही देवाचा मार्ग खरेपणाने शिकवता व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही आणि तुम्ही लोकांमध्ये पक्षपात दाखवत नाही.
कारण देवाजवळ पक्षपात नाही.
¶ मग आपण काय म्हणावे? देवाजवळ अनीती आहे काय? तसे न होवो.
¶ आणि मालकांनो तुम्ही, त्यांना न धमकावता, तुमच्या दासाशी तसेच वागा, तुम्हास हे ठाऊक आहे की, दोघाचाही मालक स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे.