तेव्हा याकोब घाबरला आणि अस्वस्थ झाला. त्याने आपल्या सोबत असणाऱ्या लोकांच्या दोन टोळ्या केल्या, तसेच शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि उंट व गाढवे यांच्याही त्याने दोन टोळ्या केल्या.
TSK
TSK · 2 इति 20:3
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
नंतर सर्व इस्राएली सैन्य आणि सर्व लोक चढून बेथेल येथे गेले आणि रडले, आणि त्यांनी तेथे परमेश्वर देवासमोर बसले. त्यांनी त्या दिवशी संध्याकाळपर्यंत उपास केला, आणि परमेश्वरास होमार्पण व शांत्यर्पणे अर्पण केले.
आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करून माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वर्गातून त्यांच्या हाकेला उत्तर देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करेन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन.
पण तू काही चांगल्या गोष्टीही केल्या आहेस. या देशातून तू अशेराचे खांब हटवलेस आणि परमेश्वरास अनुसरायचे तू मन:पूर्वक ठरवले आहेस.
¶ आता त्याच महिन्याच्या चोविसाव्या दिवशी सर्व इस्राएल लोक उपवासासाठी गोणपाट घालून व डोक्यांत धूळ घालून एकत्र जमले.
मी जेव्हा घाबरतो, तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन.
¶ ते त्यास म्हणाले, हिज्कीया असे म्हणतो, हा दिवस यातनेचा, धिक्काराचा व अपमानाचा दिवस आहे, कारण जसे बालक जन्मायला तयार आहे, पण आईला तिच्या बालकाला जन्म देण्यास शक्ती नाही.
¶ मी हे जाणून माझे मुख परमेश्वर देवाकडे वळवले, यासाठी की उपास करून व गोणताट व राख अंगावर घेऊन प्रार्थना व विनंत्या यांनी त्यास मागणे करावे.
“तरी आताही” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही आपल्या सर्व मनापासून माझ्याकडे परत या. रडा, शोक करा आणि उपवास करा.”
मग त्या मनुष्यांस परमेश्वराची खूप भीती वाटली, आणि त्यांनी परमेश्वरास यज्ञ केला आणि नवसही केले.
‹जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या.›