तर आता मी तुम्हास विनंती करतो माझ्या प्रभू राजाने आपल्या दासाचे बोलणे ऐकावे: परमेश्वराने तुम्हास माझ्यावर चेतवले असले तर त्याने अर्पण मान्य करावे. परंतु मनुष्याच्या संतानांनी चेतवले असले, तर ती परमेश्वराच्यासमोर शापित होवोत. कारण आज मला परमेश्वराच्या वतनात वाटा मिळू नये म्हणून त्यांनी मला बाहेर लावून म्हटले की, जा अन्य देवांची सेवा कर.
TSK
TSK · 2 इति 21:16
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तेव्हा परमेश्वर शलमोनाला म्हणाला, “तू आपण होऊन आपल्या कराराचा भंग केला आहेस. माझी आज्ञा तू पाळली नाहीस. तेव्हा तुझ्याकडून राज्य हिसकावून घेण्याची मी प्रतिज्ञा करतो. तुझ्या सेवकाला मी ते देईन.
देवाने शलमोनासाठी आणखी एक शत्रू निर्माण केला. तो म्हणजे रजोन. हा एल्यादाचा पुत्र. सोबाचा राजा हददेर याचा रजोन हा सेवक होता. त्याच्याकडून तो पळाला.
¶ यहोरामाच्या जागी यरूशलेमेच्या लोकांनी यहोरामाचा सर्वांत धाकटा पुत्र अहज्या याला राजा केले. यहोरामाच्या छावणीवर हल्ला करायला आलेल्या अरबी लोकांबरोबर जे लोक आले होते त्यांनी यहोरामाच्या इतर सर्व थोरल्या पुत्रांना मारुन टाकल्यामुळे यहूदात अहज्या राज्य करु लागला.
तेव्हा अश्शूरच्या राजाच्या सेनापतीकरवी परमेश्वराने यहूदावर हल्ला केला. या सेनापतींनी मनश्शेला आकड्यांनी जखडून पकडले. त्याच्या हातात पितळी बेड्या ठोकल्या. अशा रीतीने मनश्शेला कैद करून त्यांनी बाबेलला नेले.
¶ तेव्हा यहूदा व बन्यामिनाच्या घराण्यातील प्रमुखांनी, याजक व लेवी आणि प्रत्येकजण ज्यांना देवाने प्रेरणा दिली होती ते उत्साहाने परमेश्वराचे मंदीर बांधण्यासाठी यरूशलेमेला जाण्यास सिद्ध झाले.
मी परमेश्वर आहे आणि मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही नाही. जरीही तू मला ओळखत नव्हतास, तरीही तुला युद्धास सशस्त्र केले.
रणशिंगे फुंकली गेली, तर लोक भिणार नाहीत काय? नगरावर संकट आले आणि ते परमेश्वराने घडवून आणले नाही असे होईल का?