TSK

TSK · 2 इति 24:18

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

जेरहाचा पुत्र आखान याने समर्पित वस्तुंविषयी आज्ञेचा भंग केला, आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नाही काय? आणि तो पुरुष आपल्या अपराधामुळे एकटाच मेला नाही.

तेव्हा असे झाले की, गिदोन मरण पावल्यावर इस्राएलाच्या लोकांनी फिरून बाल देवामागे लागून व्यभिचार केला, आणि बआल-बरीथ ह्याला आपला देव केले.

तो वृध्द झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्यास इतर दैवतांकडे वळवले. आपले वडिल दावीद याच्या प्रमाणे शलमोन परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला नाही.

या लोकांनी उंचवटयांवर देऊळे, दगडी स्मारके आणि स्तंभ उभारले. परकीय दैवतासाठी हे सारे होते. प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार वृक्षाखाली त्यांनी हे केले व अशेरा मूर्ती स्थापिल्या.

रहबामाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी शिशकने यरूशलेमेवर हल्ला चढवला. शिशक हा मिसरचा राजा होता. रहबाम आणि यहूदाचे लोक यांनी परमेश्वराचा मार्ग सोडल्यामुळे असे झाले.

उलट तू इस्राएलच्या राजांचा कित्ता गिरवला आहेस. यहूदा आणि यरूशलेममधील लोकांस तू परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागायला लावले आहेस. अहाब आणि त्याचे घराणे यांनी हेच केले. ते परमेश्वराशी एकनिष्ठ राहिले नाहीत. तू स्वत:च्या भावांची हत्या केलीस. ते तुझ्यापेक्षा वर्तणुकीने चांगले होते.

पुढे योवाशाने परमेश्वराच्या मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचे ठरवले.

ती इस्राएली सैन्याला म्हणाली, “यहूदाच्या कैद्यांना इकडे आणू नका. तसे केलेत तर तो परमेश्वराचा आपण केलेला मोठा अपराध ठरेल. आपल्या पापांमध्ये त्यामुळे आणखी भर पडेल. इस्राएलावर परमेश्वराचा कोप होईल.”

पण हिज्कीयाला गर्व वाटू लागला होता. त्यामुळे त्याने परमेश्वराने दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल त्यास धन्यवाद दिले नाहीत. या गोष्टीमुळे हिज्कीयावर आणि यहूदा व यरूशलेमेच्या लोकांवर परमेश्वर कोपला.

माझ्याकडे पाठ फिरवून इतर देवतांपुढे त्यांनी धूप जाळला म्हणून मी असे करणार आहे. आपल्या दुष्कृत्यांमुळे लोकांनी मला सतंप्त केले आहे. या क्रोधाचा अंगार त्यांच्यावर बरसेल आणि तो शांत होणार नाही.

यहूदाचे पुढारी सिमेचा दगड सारणाऱ्यासारखे आहेत, मी माझा राग त्यांच्यावर पाण्यासारखा ओतणार.

मी आपला हात यहूदावर आणि यरूशलेमवासीयांवर लांब करीन व बआलमूर्तीचे उरलेले आणि याजकांमधील मूर्तीपूजक लोक यांचे नाव मी या जागेवरून नष्ट करीन.