TSK

TSK · 2 इति 31:10

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

इसहाकाने त्या देशात धान्य पेरले आणि त्याच वर्षी त्यास शंभरपट पीक मिळाले, कारण परमेश्वराने त्यास आशीर्वाद दिला.

तेव्हा त्याने आपल्या घरात आणि आपले जे काही होते त्या सर्वावर योसेफाला कारभारी केले तेव्हापासून परमेश्वराने योसेफामुळे त्या मिसऱ्याच्या घरास आशीर्वाद दिला. घरात व शेतीत जे काही पोटीफराच्या मालकीचे होते त्या सर्वावर परमेश्वराचा आशीर्वाद होता.

त्यांच्या हाती जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती.

तुम्ही असे कराल तर मी तुमच्यासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन; जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील.

परमेश्वराच्या कृपेने तुमची कोठारे भरलेली राहतील. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हास जो देश देत आहे त्यामध्ये तुमची भरभराट होईल.

त्याचा सेवक म्हणाला, “शंभर मनुष्यांना हे कसे पुरणार?” पण अलीशा म्हणाला, “तू ते सर्वांना वाटून दे. परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर त्यातून काही उरेल.”

अजऱ्या म्हणजे सरायाचे पिता. सरायाने यहोसादाकला जन्म दिला.

तेव्हा याजक अजऱ्या आणि आणखी परमेश्वराचे ऐंशी धैर्यवान याजक त्याच्यापाठोपाठ तिथे गेले.

त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी पिंपे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील.

तेथे कोणी एकजन बी पेरतो तो अधिक गोळा करतो; दुसरा पेरीत नाही तो दरिद्री होईल.

सर्वप्रथम फळांचा प्रथमभाग, समर्पित अंश म्हणून अर्पण करावयाची प्रत्येक वस्तू याजकाची व्हावी; तुम्ही मळलेल्या पिठाचा पहिला भाग याजकाचा असेल. अशासाठी की, तुझ्या घरात आशीर्वाद राहावा.

¶ सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “माझ्या घरात अन्न असावे यासाठी तुम्ही संपूर्ण दशमांश कोठरांत आणा. आणि तुम्ही असे केले म्हणजे मी तुमच्यासाठी आकाशाच्या खिडक्या उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हावर ओतीन की नाही याविषयी माझी प्रचिती पाहा.

तुमच्याजवळ सर्व गोष्टींत सदा, सर्व पुरवठा रहावा आणि प्रत्येक चांगल्या कामात तुम्ही संपन्न व्हावे म्हणून देव तुम्हास सर्व प्रकारची कृपा पुरवण्यास समर्थ आहे.

कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.