TSK

TSK · 2 इति 36:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

बेडकांची पीडा दूर झाली हे फारोने पाहिले आणि त्याचे मन पुन्हा कठीण झाले. त्याने त्यांचे ऐकले नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले.

तू अजूनही माझ्या लोकांविरुद्ध आहेस. तू त्यांना जाऊ देत नाहीस.

मग यहोशवाने त्यांच्याशी समेट केला आणि त्यांना जीवन बहाल करून सुरक्षित ठेवण्याचे अभिवचन दिले. लोकांच्या नेत्यांनीही त्यांच्याशी शपथ घेतली.

गिबोनी म्हणजे इस्राएली नव्हेत ते अमोरी होत इस्राएलींनी त्यांना दुखापत न करण्याचे वचन दिले होते. तरी शौलाने गिबोन्यांच्या वधाचा प्रयत्न केला. इस्राएली आणि यहूदा लोकांविषयीच्या अति उत्साहामुळे त्याने तसे केले गिबोन्यांना एकत्र बोलावून राजा दावीदाने त्यांच्याशी बोलणे केले.

तेव्हा परमेश्वराने संतापाने यरूशलेम आणि यहूदा यांची हकालपट्टी केली. नंतर सिद्कीयाने बाबेलाच्या राज्याविरूद्ध बंडखोरी केली.

आपल्या पूर्वजांसारखे ताठर बनू नका. मनोभावे परमेश्वरास शरण जा मंदिराच्या पवित्र गाभाऱ्याकडे या. परमेश्वराने ते पवित्रस्थान कायमचे पवित्र केले आहे. परमेश्वर देवाची सेवा करा. तरच परमेश्वराचा तुमच्यावर भडकलेला कोप शांत होईल.

¶ पण ते आणि आमचे पूर्वज उन्मत्त होऊन ताठ मानेचे बनले आणि त्यांनी तुझ्या आज्ञा ऐकण्याचे नाकारले.

त्यांनी पुन्हा तुझ्या नियमाकडे वळावे म्हणून तू त्यास बजावलेस. तरी हट्टीपणाने वागून त्यांनी तुझ्या आज्ञा ऐकण्याचे नाकारले. जो कोणी तुझ्या आज्ञा पाळतो तो जिवंत राहतो. पण त्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले. त्यांनी आज्ञापालन केले नाही, परंतु त्यांनी लक्ष दिले नाही व त्यांनी त्या ऐकण्याचेहि नाकारले.

कारण मला माहित होते की तुम्ही हट्टी आहात, तुमच्या मानेचे स्नायु लोखंडाप्रमाणे ताठ आणि तुझे कपाळ कांस्याचे आहे.

मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला

तर आपली अंतःकरणे कठीण करू नका. ज्याप्रमाणे इस्त्राएल लोकांनी अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली,