त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार केला. तो म्हणाला, “मिसर देशाच्या नदीपासून फरात महानदीपर्यंतचा
TSK
TSK · 2 इति 7:8
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेहि अंगमेहनतीचे काम करू नये आणि परमेश्वरासाठी सात दिवस सण साजरा करावा.
खळ्यातील आणि द्राक्षकुंडामधील उत्पन्न जमा केल्यावर सात दिवसानी मंडपाचा सण साजरा करा.
नदीपासून ते पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत व मिसराच्या सीमेपर्यंत शलमोनाची सत्ता होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत.
शलमोनाने आणि त्याच्याबरोबर सर्वांनी त्यादिवशी मंदिरात उत्सव साजरा केला. हमाथ खिंडीपासून मिसरच्या सीमेपर्यंतच्या भागातील सर्व इस्राएल लोक तेथे हजर होते. हा समुदाय प्रचंड होता. सात दिवस त्यांनी परमेश्वराच्या सान्निध्यात खाण्यापिण्यात आणि मजेत घालवले. आणखी सात दिवस त्यांनी आपला मुक्काम लांबवला. अशाप्रकारे हा सोहळा चौदा दिवस चालला.
दुसऱ्या महिन्यात बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी लोक प्रचंड संख्येने यरूशलेमेत जमले. तो एक विशाल समुदाय होता.
“पण हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुझ्याविरुध्द एका राष्ट्राला उठवीन, ते राष्ट्र तुमच्या संबंध देशाला लेबो-हमाथपासून अराबाच्या ओढ्यापर्यंतच्या सगळ्या प्रदेशाला दु:ख देईल.” सेनाधीश परमेश्वर देव, असे म्हणतो.
यहूद्यांचा मंडपाचा सण जवळ आला होता.