TSK

TSK · 2 राजे 12:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

बाशा हा अहीयाचा पुत्र. हे इस्साखाराच्या वंशातले. बाशाने नादाब राजाला मारायचा कट केला. नादाब आणि इस्राएल लोक गिब्बथोन या पलिष्ट्यांच्या नगराला वेढा घालत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. बाशाने या ठिकाणी नादाबला ठार केले.

¶ यहूदाचा राजा अहज्या याने ते पाहिले आणि तेथून पळ काढला. मळ्यातल्या एका घराच्या बाजूने तो गेला. येहूने त्याचा पाठलाग केला. येहू म्हणाला, “अहज्याचाही वध करा.” तेव्हा येहूच्या मनुष्यांनी अहज्याला इब्लाम जवळच्या गूरच्या रस्त्यावर जखमी केले. तेव्हा अहज्या मगिद्दोकडे पळाला पण तिथेच मरण पावला.

¶ इस्राएलचा राजा, यहोआहाज याचा मुलगा योवाश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी, योवाशाचा मुलगा अमस्या यहूदावर राज्य करू लागला.

त्यांनी यरूशलेमामध्ये अमस्याविरुध्द कट केला, तेव्हा तो लाखीश येथे पळाला. पण त्यांनी त्यांच्यामागे लाखीशास माणसे पाठवून तेथे त्यास जिवे मारले.

जाबाद आणि यहोजाबाद हे ते फितूर सेवक. जाबादच्या आईचे नाव शिमथ. ही अम्मोनची होती. यहोजाबादाच्या आईचे नाव शिम्रिथ. ही मवाबी होती.