TSK

TSK · 2 शमु 3:35

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

आणि इस्राएली लोक वर गेले आणि परमेश्वरासमोर संध्याकाळपर्यंत रडले. आणि त्यांनी परमेश्वरास विचारले, “आमचा बंधू बन्यामीन याच्या लोकांशी लढण्यास मी पुन्हा जावे काय?” परमेश्वर म्हणाला, “त्यांच्यावर हल्ला करा.”

तुम्ही मराल तेथे मी मरेन व तिथेच मला पुरले जाईल. मरणाशिवाय कशानेही तुमचा माझा वियोग झाला तर परमेश्वर मला शिक्षा करो किंवा त्यापेक्षा अधिक करो.”

दुःखाने त्यांनी आक्रोश केला. संध्याकाळपर्यंत त्यांनी काही खाल्ले नाही. शौल, त्याचा मुलगा योनाथान त्याचप्रमाणे परमेश्वराचे लोक म्हणजे इस्राएलाचे लोक युद्धात मृत्युमुखी पडले याबद्दल त्यांनी शोक केला.

घरातील वडीलधाऱ्या मनुष्यांनी येऊन दावीदाला जमिनीवरून उठवायचा खूप प्रयत्न केला. पण काही केल्या दावीद तेथून हलेना. त्यांच्याबरोबर खायला प्यायलाही त्याने नकार दिला.

मृतांबद्दल शोक करणाऱ्यांसाठी कोणीही अन्न आणणार नाही. ज्यांचे आईवडील गेले आहेत, त्यांचे कोणी सांत्वन करणार नाही. मृतांसाठी शोक करणाऱ्यांसाठी, कोणीही पेये आणून सांत्वन करणार नाही.

¶ मग मी जे केले तेच तुम्ही कराल; तू आपले तोंड खाली घालणार नाही, दुःखाच्या समयी लोक देतात ती खावयाची भाकर खाणार नाही.