TSK

TSK · 2 शमु 6:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परंतु आता तुझे राज्य चालू राहणार नाही. परमेश्वराने आपल्या मनासारखा मनुष्य शोधला आहे, आणि त्यास आपल्या लोकांचा राजा होण्यास नेमले आहे, कारण परमेश्वराने जे तुला आज्ञापिले ते तू पाळले नाही.”

¶ मग परमेश्वराने शमुवेलाला सांगितले की, “मी इस्राएलावर राज्य करण्यापासून शौलाला नाकारले आहे, तर तू किती काळ त्यासाठी शोक करशील? आपल्या शिंगात तेल भरून चल. इशाय बेथलहेमी याच्याकडे मी तुला पाठवितो. कारण मी त्याच्या एका मूलाला माझ्यासाठी राजा म्हणून निवडले आहे.”

शौल राज्यावर होता तेव्हा सुध्दा तुम्हीच युध्दात आमचे नेतृत्व करत होता. इस्राएलांना युध्दावरून तुम्हीच परत आणत होता. खुद्द परमेश्वर तुम्हास म्हणाला, “माझ्या इस्राएल प्रजेचा तू मेंढपाळ होशील. इस्राएलवर राज्य करशील.”

सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नृत्य करत होता.

¶ पण परमेश्वराच्या कराराचा कोश दावीद नगरात पोहचला तेव्हा शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून बाहेर पाहिले. तिने दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून तिने आपल्या अंतःकरणात त्यास तुच्छ लेखले.

पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास; तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे; लोकांतून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे.

म्हणून खाताना, पिताना किंवा काहीही करताना सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा.