¶ परमेश्वराने इस्राएलला त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून विसावा दिल्यानंतर बराच काळ लोटला, आणि यहोशवा वृद्ध झाला होता.
TSK
TSK · 2 शमु 7:1
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
परंतु आता परमेश्वराने सर्व बाजूंनी माझ्या राज्याला शांतता दिली आहे. मला आता शत्रू किंवा अरिष्ट राहीले नाही.
¶ मग त्याने आपला पुत्र शलमोन याला बोलावले. इस्राएलचा देव परमेश्वर याच्यासाठी मंदिर बांधण्याची त्याने त्यास आज्ञा दिली.
¶ नंतर राजा दावीद त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला, “माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका परमेश्वराचा कराराचा कोश ठेवण्यासाठी आणि देवाच्या पादासनासाठी एक विसाव्याचे घर बांधावे असा माझा मानस होता. त्याच्या बांधकामासाठी मी तयारी ही केली होती.
त्यामुळे यहोशाफाटाच्या राज्यात शांतता नांदली. देवाने यहोशाफाटाला सर्व बाजूंनी स्वास्थ्य दिले.
परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या सर्वसमर्थ देवासाठी निवासमंडप सापडेपर्यंत मी असेच करीन.”
ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूच्या हातातून सोडवले जाऊन,