मग मी परमेश्वरापुढे जमिनीवर डोके टेकून पूर्वीप्रमाणेच चाळीस दिवस अन् चाळीस रात्र पालथा पडून राहिलो. तुमच्या घोर पापामुळे मी हे केले. परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही हे फार वाईट केले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतलात.
TSK
TSK · प्रेषि 1:3
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ त्या राजाच्या दिवसात स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधीही नाश होणार नाही, त्यास कोणी जिंकणार नाही ते तर सर्व राज्याचे तुकडे करून त्या सर्वांचा नाश करील व ते सर्व काळ टिकेल.
चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यानंतर येशूंना भूक लागली.
मग पाहा; येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, ‹“शांती असो!”› त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्यास नमन केले.
ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले.
¶ आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या आणि त्यांनी स्वतः तयार केलेले सुगंधी मसाले आणले.
¶ आणि पुन्हा, आठ दिवसानी, त्याचे शिष्य घरात होते आणि थोमा त्यांच्याबरोबर होता; आणि दरवाजे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला आणि म्हणाला, ‹“तुम्हास शांती असो.”›
येशू मरण पावलेल्यातून उठल्यानंतर त्याची शिष्यांना प्रकट व्हायची ही तिसरी वेळ.
त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला, त्याने प्रभू येशूविषयी शिक्षण दिले, तो हे काम फार धैर्याने करीत असे आणि कोणीही त्यास बोलण्यात अडवू शकले नाही.
व तो केफाला दिसला, नंतर बारा प्रेषितांना,
जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे त्यास शोभेल असे तुम्ही चालावे.