कनान्यांची सीमा सीदोनापासून गराराकडे जाते त्या वाटेने गज्जा शहरापर्यंत होती. सदोम व गमोरा व तसेच अदमा व सबोयिम या शहरांकडे जाणाऱ्या वाटेवर लेशापर्यंत ती होती.
TSK
TSK · प्रेषि 12:20
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
माझे नोकर ती लबानोनातून समुद्रापर्यंत वाहून आणतील मग त्याचे तराफे करून तुला हव्या त्याठिकाणी समुद्रावरुन ते आणतील. तेथे ते तराफे सोडवले जातील. मग तेथून तू घे. माझ्या सेवकांना अन्नपुरवठा तू दिला तो माझ्या ईच्छेनुसार पुरेसा असेल.”
माझ्या स्वामींनी गहू, जव, तेल आणि द्राक्षरस देण्याचे कबूल केले आहे ते सर्व आमच्या नोकरांना द्यावे.
कोणीतरी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, तसे भांडणाला सुरवात होण्यासारखे आहे, म्हणून भांडण होण्यापूर्वीच त्यापासून दूर निघून जा.
फिर्याद करायला जाण्याची घाई करू नको. ती तू केलीस तर शेवटी तुझ्या शेजाऱ्याने तुला लज्जित केले तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल.
¶ सोर विषयी देववाणी, तार्शीशच्या जहाजानों, आक्रोश करा कारण तुमच्या जहाजासाठी बंदर व तुमच्यासाठी घर नाही, असे कित्तीमच्या देशापासून त्यांना प्रगट करण्यात आले आहे.
यहूदा व इस्राएल देश ह्यांचाही तुझ्याबरोबर व्यापार होता. ते तुझ्या मालाबद्दल मिन्नीथाचा गहू, मेवामिठाई, मध, तेल आणि ऊद पुरवत होते.
“मी तुम्हास तुमच्या सर्व नगरांत दातांची स्वच्छता दिली आणि तुमच्या सर्व स्थानांत भाकरीचा तोटा दिला, तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत.” असे परमेश्वर म्हणतो.
त्या दिवसात जर कोणी वीस मापे धान्याच्या राशीजवळ आला तर त्याच्या हाती दहा मापेच लागत. द्राक्षकुंडातून पन्नास पात्रे भरून काढावयास गेला तर त्यास फक्त वीसच मिळत होते.
‹किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का? की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्यास त्याचा सामना करता येणे शक्य आहे काय?›