TSK

TSK · प्रेषि 13:20

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व त्याने इस्राएलाचा न्याय केला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले,

शमुवेल परमेश्वराचा नियुक्त केलेला भविष्यवादी आहे असे दानापासून बैर-शेबापर्यंत सर्व इस्राएलांना समजले.

इस्राएल लोकांवर मी, परमेश्वर, शास्ते नेमिले होते तेव्हापासून दुर्जनांनी त्यांना त्रास दिला तसे आता घडणार नाही. तुझ्या सर्व शंत्रूपासून मी तुला शांती देतो. मी तुला असे अभिवचन देतो की, तुझे घराणे कायमचे राजघराणे होईल.

सर्व इस्राएलाबरोबर ज्या ज्या ठिकाणांमध्ये मी फिरत आलो तेथे तेथे ज्यांना माझ्या लोकांचे पालन करण्यासाठी मी नेमले त्या इस्राएलाच्या पुढाऱ्यांतील कोणा एकालाही ‘माझ्यासाठी तुम्ही गंधसरूचे घर का बांधले नाही, असा एक शब्द तरी मी कधी बोललो काय?’”