TSK

TSK · प्रेषि 15:25

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

‹होय पित्या, तू हे केलेस, कारण खरोखर तुला हेच योग्य वाटले होते.›

हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया, व त्याचे भाऊ एकचित्ताने एकसारखे प्रार्थना करत होते.

ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत;

¶ मग प्रेषित व वडीलवर्ग या प्रकरणाचा विचार करावयास जमले.

ह्याकरिता यहूदा व सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे ते स्वतः या गोष्टी तुम्हास तोंडी सांगतील.

¶ प्रभूमध्ये श्रम करणार्‍या त्रुफैना व त्रुफोसा ह्यांना सलाम द्या. प्रिय पर्सिस हिला सलाम द्या. प्रभूमध्ये तिने पुष्कळ श्रम केले आहेत.

आणि त्यांनी मला दिलेले कृपादान ओळखून, याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ होते त्यांनी मला व बर्णबाला उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यांत सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांनी सुंता झालेल्याकडे जावे.

¶ माझा प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्यासोबतीचा दास हा माझ्याविषयी सर्व गोष्टी तुम्हास कळवील.

त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधू, असे व्हावे, मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर तो देहदृष्ट्या व प्रभूच्या ठायी ह्याहून कितीतरी अधिक प्रिय असावा.