¶ नंतर मोशे म्हणाला, “परमेश्वराने मला मी तुम्हास सांगितलेल्या गोष्टी करायला पाठवले आहे या बद्दलचा पुरावा मी तुम्हास दाखवीन. या गोष्टी करण्याची कल्पना माझी नव्हती हेही मी तुम्हास दाखवीन.
TSK
TSK · प्रेषि 2:40
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तुमचे अज्ञानाचे मार्ग मागे सोडा आणि जिवंत रहा; सुज्ञानाच्या मार्गाने चला.”
‹अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हास चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? जे अंतःकरणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते.›
येशूने उत्तर दिले, ‹“अहो अविश्वासू व विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू? मी तुमचे किती सहन करू? त्यास माझ्याकडे आणा.”›
‹देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”›
¶ आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.
यहूदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.
युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता, पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की, तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला, जेव्हा त्यास उचलले, तेव्हा तो मरण पावलेला आढळला.
पश्चात्ताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांस सारखीच साक्ष दिली.
¶ तेव्हा यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले, तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली, मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला, हे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता.
आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुद्ध त्यास शिवू नका; म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन.
¶ म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात आग्रहाने विनंती करतोः ज्याप्रमाणे परराष्ट्रीय भ्रष्ट मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका.
तुम्हास ठाऊकच आहे की, पिता आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की,
¶ बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा.
¶ मी ज्या सिल्वानला विश्वासू बंधू म्हणून मानतो त्याच्याहाती तुम्हास थोडक्यात लिहून पाठवून, बोध करतो आणि साक्ष देतो की, ही देवाची खरी कृपा आहे. त्यामध्ये तुम्ही स्थिर रहा.
¶ मग मी स्वर्गातून आणखी एक वाणी ऐकली; ती म्हणाली, अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर या. म्हणजे तुम्ही तिच्या पापात भागीदार होऊ नये आणि यासाठी की, तिच्या कोणत्याही पीडा तुमच्यावर येऊ नयेत.