इस्राएल अतिशय म्हातारा झाला होता आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्यास चांगले स्पष्ट दिसत नव्हते. तेव्हा इस्राएलाने त्या मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेतले.
TSK
TSK · प्रेषि 20:1
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
जेव्हा बर्णबाने त्यास शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले, शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे मंडळीत राहून पुष्कळ लोकांस शिकवले, अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा मिळाले.
¶ या गोष्टी घडल्यानंतर पौलाला पवित्र आत्म्याने सुचवले की, मासेदोनिया व अखया या प्रांतांतून प्रवास करीत पुढे यरूशलेम शहरास जायचे आहे, तो म्हणाला, “मी तेथे गेल्यांनतर मला रोम शहरही पाहिलेच पाहिजे.”
पौल खाली गेला व त्याच्यावर ओणवा पडला आणि त्यास आपल्या हातांनी कवेत धरून म्हणाला, “चिंता करू नका! त्याच्यात अजून जीव आहे.”
आमच्या भेटीचे दिवस संपत आल्यावर आम्ही तेथून निघून आमचा पुढील प्रवास परत सुरू केला, त्यावेळी तेथील बंधुजन आपल्या पत्नी, मुलांच्याबरोबर आमच्यासह शहराबाहेर आले व तेथील समुद्रकिनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकले व प्रार्थना केली.
¶ मी मासेदोनिया प्रांतातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन कारण मासेदोनियातून जाण्याची माझी योजना आहे.
¶ कारण आम्ही मासेदोनियास आल्यावर आमच्या शरीराला स्वास्थ्य नव्हते; आम्हास सगळीकडून त्रास देण्यात आला, बाहेरून भांडणे व आतून भीती.
सर्व बंधूंना पवित्र प्रीतीने नमस्कार सांगा.