लूक 5:4
TSK
त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला, ‹“होडी खोल पाण्यात घेऊन चल आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.”›
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला, ‹“होडी खोल पाण्यात घेऊन चल आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.”›
त्यास असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांस सुवार्ता सांगावयास देवाने आम्हास बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला.
अद्रमुत्तिय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो, हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते, आम्ही या जहाजातून प्रवासास निघालो, तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथे राहणारा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.
¶ बंधूनो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुम्हापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हास विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला;