TSK

TSK · प्रेषि 26:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

पुढे मी खरेदीखत जे नियमाप्रमाणे व रीतीप्रमाणे मोहोरबंद केलेले होते ते आणि जे मोहोरबंद नव्हते तेही घेतले,

या यहूदी लोकांनी तुझ्याविषयी ऐकले आहे की, जे यहूदी इतर देशात राहतात त्यांना तू मोशेचे नियम पाळू नका असे सांगतोस, तसेच आपल्या मुलांची सुंता करू नका असे सांगतो व आपल्या चालीरीती पाळू नका असे सांगतो.

मग सुभेदाराने बोलण्यास खुणविल्यावर पौलाने उत्तर दिले, “आपण पुष्कळ वर्षापासून या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्यासंबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो.

परंतु सम्राटाला याच्याविषयी निशिचत असे कळवावे, असे माझ्याकडे काही नाही, म्हणून मी याला तुमच्यापुढे आणि विशेषतः राजा अग्रिप्पापुढे आणून उभे केले आहे, ते अशाकरिता की, या चौकशीनंतर मला या मनुष्याविषयी काहीतरी लिहिता यावे.

येथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणाने बोलू शकतो, त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल, असे मला खात्रीने वाटते, मी हे म्हणतो, कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही.

आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले आणि मला डोंगर हलवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काही नाही.