TSK

TSK · प्रेषि 5:32

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते.

‹तरीही मी तुम्हास खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या फायद्याचे आहे, कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर मी त्यास तुमच्याकडे पाठवीन;›

तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.

पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हास पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.

येशूने संपूर्ण यहूदीया प्रांतात आणि यरूशलेम शहरात जे जे केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, पण येशूला मारण्यात आले, लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्यास टांगून मारले.

यानंतर, पुष्कळ दिवसांपर्यंत जे त्याच्याबरोबर होते, त्यांना गालील प्रांतापासून यरूशलेम शहरापर्यंत येशूने दर्शन दिले, ते लोक आता त्याचे साक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत.

¶ मी आता तिसर्‍या वेळी तुमच्याकडे येत आहे. दोन किंवा तीन साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध होईल.

त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हास शुभवर्तमान सांगणार्‍यांनी आता ज्या गोष्टी तुम्हास सांगितल्या, त्यामध्ये ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे.